Hair Tips : split ends वर रामबाण उपाय..मिळवा सुंदर रेशमी केस

केसांना जिथे फाटे फुटले आहेत तिथे रोज मध लावून मसाज करावा  असं केल्याने 

Updated: Nov 10, 2022, 03:47 PM IST
Hair Tips : split ends वर रामबाण उपाय..मिळवा सुंदर रेशमी केस  title=

split ends remedies: आजकाल बरेच जण केसांच्या समस्येपासून हैराण असतात. प्रदूषण, बदलती जीवनशैली, केमिकलयुक्त प्रोडक्टस चा सर्रास वापर, या सर्वांचा परिणाम केसांवर होऊ लागतो आणि आपले केस निर्जीव, फाटे फुटलेले आणि ड्राय दिसू लागतात. अशावेळी आपण अनेक ट्रीटमेंट्स  करतो अनेक उपाय करून पाहतो पण त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. 
तुम्हीही ड्राय निर्जीव आणि स्प्लिट एंड्स सारख्या केसांच्या समस्येमुळे हैराण असाल तर या काही खास टिप्स तुमच्यासाठी... 

दूध
एका भांड्यात दूध घ्या आणि फाटे फुटलेले केस त्यात बुडवा.  जवळपास १५-२० मिनिट केस तसेच राहूदेत.  या नंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून टाका. 

मध 
केसांना जिथे फाटे फुटले आहेत तिथे रोज मध लावून मसाज करावा  असं केल्याने केसांचा रुक्षपणा कमी होईल आणि ते सुंदर होऊ लागतील . 

पपई 
पपईमध्ये  एंटीऑक्सीडेंट्स च प्रमाण खूप असत. जे केसांना पोषक ठेवण्यास मदत करतात. पपई बारीक करून पेस्ट बनवा फाटे फुटलेल्या केसांवर हा गर लावा एक तास तसाच राहूदे यांनतर केस स्वच्छ धुवा . 

दही
दह्याने केसांना मसाज करा शक्य असेल तर घरच्या घरी दही बनवा आणि ते मलाईचं बनलं असेल तर आणखीच उत्तम 

खोबरेल तेल 

रोज अंघोळ करण्यापूर्वी  केसांना हलक्या गरम खोबरेल तेलाने मसाज करावा आणि त्यांनतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. असं केल्याने तुमचे केस नेहमी मुलायम राहतील आणि स्प्लिट एंड्स चा त्रास होणार नाही. 

(टीप : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे झी24 तास याची खातरजमा करत नाही)