तुमच्या 5 वर्षांच्या आतील बाळाला घसादुखी, ताप असेल तर हलक्यात घेऊ नका

एक लहानशी चूक पश्चातापाची वेळ आणेल. वाचा लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी   

Updated: Oct 27, 2022, 11:21 AM IST
तुमच्या 5 वर्षांच्या आतील बाळाला घसादुखी, ताप असेल तर हलक्यात घेऊ नका  title=
causes and symptoms of respiratory syncytial virus disease read details

Respiratory Syncytial Virus Disease : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या एका निरीक्षणातून अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. सध्याच्या काळात 5 वर्षे आणि त्याहून कमी वय असणाऱ्या लहानग्यांमध्ये Respiratory Syncytial Virus Disease अर्थात आरएसव्ही  (RSV) व्हायरसचा धोका बळावत आहे. सर्वप्रथम या संकटानं ब्रिटनमध्ये तोंड वर काढलं होतं. ज्यामुळं 2019 या वर्षात तिथे 1 लाखांहून अधिक मुलांचा मृत्यू ओढावला होता. आता भारतामध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. बाटलीतून दूध पिणाऱ्या लहान मुलांना या व्हायरसचा अधिक धोका असल्याची बाब निरीक्षणातून समोर आली आहे.  (causes and symptoms of respiratory syncytial virus disease read details)

RSV व्हायरस म्हणजे काय? (What is RSV Virus?)
हा एक श्वसनाशी संबंधित संसर्ग आहे. जिथं 5 वर्षांहून कमी वय असणाऱ्या बालकांना याचा त्रास होतो. या संसर्गामुळे बालकांमध्ये न्युमोनिया आणि ब्रोंकियोलाइटिसची लक्षणं दिसून येतात. जन्मापासूनच बाटलीतून दूध पिण्याची सवय ज्या बालकांना असते त्यांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका. विषाणूच्या ससंर्गानं धोक्याची पातळी ओलांडल्यास यामध्ये रुग्ण दगावण्याचीही भीती असते. 

अधिक वाचा :Horse Gram: चरबी मेणासारखी वितळवतं 'हे' सुपरफूड, कोलेस्ट्रॉल-डायबिटीज ठेवतो नियंत्रणात

या संसर्गाची कारणं (RSV Virus Infection Causes)
- फुफ्फुसांचे विकार
- कॅन्सर, किमोथेरेपी 
- कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती 
- सांध्यांचा अशक्यपणा 

RSV ची लक्षणं (RSV Virus Infection Symptoms)
या विषाणूचा संसर्ग झाल्यास बहुतांश लहान मुलांमध्ये ताप, घसादुखी, भीती, श्वास घेण्यात अडचणी अशी लक्षणं दिसू लागतात. 
- खोकला, ताप, सर्दी
- घसादुखी, श्वास घेण्यात अडचणी
- डोकेदुखी
- त्वचेच्या रंगात बदल 

अद्यापही या संसर्गावर कोणताही उपाय सापडू शकलेला नाही. पण, डॉक्टरांकडून त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी मात्र काही औषघं दिली जातात. त्यामुळे तुमच्या लेकरांमध्ये अशी कोणती लक्षणं दिसल्यास ती हलक्यात न घेता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.