Blood Donation: रक्तदान करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयत का?जाणून घ्या

Blood Donation : रक्तदान केल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका कमी होतो, तुम्हाला माहितीय का?

Updated: Oct 17, 2022, 09:46 PM IST
Blood Donation: रक्तदान करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयत का?जाणून घ्या title=

मुंबई : Blood Donation रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, असे बोललं जातं, मात्र या दानासाठी काही क्वचितच हात पुढे येतात. काहींना रक्तदाना केल्याने अशक्तपणा येईल, अशी भीती वाटत असते. त्यामुळे असंख्य हात पुढेच येत नाहीत. मात्र रक्तदानाने (Blood Donate) असंख्य लोकांचे प्राण वाचवता येतात. तसेच स्वत:चेही प्राण वाचवण्याचा देखील रक्तदान हा एकमेवच मार्ग आहे. कारण रक्तदान केल्याने अनेक गंभीर आजाराचा धोका कमी होतो. त्यामुळे चला जाणून घेऊया रक्तदान करण्याचे काय फायदे आहेत ते. 

हे ही वाचा : ओठांचा काळेपणा दूर करायचाय, जाणून घ्या 
 
रक्तदानाचे फायदे 

हृदय निरोगी ठेवतं

रक्तदान (Blood Donation) केल्यामुळे हृदय निरोगी राहते. जे लोक रक्तदान करत राहतात त्यांना हृदयविकार (Heart Attack) आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका कमी असतो. रक्तातील लोह जास्त असल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. रक्तदान करताना लोहाचे प्रमाण संतुलित राहते.

कर्करोगाचा धोका कमी

जे नागरीक सतत रक्तदान (Blood Donation) करत राहतात त्यांच्या शरीरात लोहाचे संतुलन राखले जाते. यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा (Cancer) धोका कमी होऊ शकतो. रक्तदान केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

लठ्ठपणा कमी करतो

रक्तदान (Blood Donation) केल्याने वजन कमी होते आणि जास्त कॅलरीज बर्न होतात. रक्तदान केल्यानंतर काही महिन्यांत लाल रक्तपेशींची पातळी समान होते. जर तुम्ही सकस आहार आणि व्यायाम एकत्र करत असाल तर लठ्ठपणा झपाट्याने कमी होतो.

लाल पेशी वाढतात

रक्तदान (Blood Donation) करणाऱ्या लोकांच्या शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान होते. त्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी वाढतात. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.

एकंदरीत आरोग्य चांगले राहते

जे लोक नियमित रक्तदान (Blood Donation) करतात त्यांचे आरोग्य इतरांपेक्षा चांगले असते. तसेच रक्तदाब नियंत्रित (Blood Pressure) ठेवण्यास मदत होते. रक्तदान करून तुम्ही कोणाचा तरी जीव वाचवत आहात, त्यामुळे मानसिक समाधानही मिळते.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)