मुंबई : सुपरस्टार आमिर खान आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली एका चॅट शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.
दिवाळीच्या मुहूर्तावर हा प्रसारित होणा-या या शोमध्ये प्रेक्षक पहिल्यांदाच या दोन दिग्गजांना एकत्र बघणार आहेत. सध्या आमिर खान हा ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या शोमधून विराट कोहलीच्या जीवनातील अनेक गोष्टींवरून पडदा उठणार आहे.
या शोमध्ये विराट कोहलीने त्याची गर्लफ्रेन्ड आणि रिलेशनशीपवरून आमिर समोर अनेक गुपितं उघडी केली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या चॅट शोमध्ये आमिरसोबत झालेल्या गप्पांमध्ये विराटने सांगितले की, तशी तर त्याची गर्लफ्रेन्ड खूप चांगली आहे. ती खूप इमानदार आणि काळजी घेणारी आहे. पण तिच्यात एक कमी आहे.
विराटने सांगितले की, त्याच्या गर्लफ्रेन्डमध्ये एक कमतरता आहे. जी त्याला अजिबात आवडत नाही. विराटने सांगितले की, त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डचं उशिरा येणं अजिबात आवडत नाही. त्याची गर्लफ्रेन्ड नेहमीच ५ ते ७ मिनिटे उशिरा येते.
तशी तर अनुष्का शर्मा कधीही सार्वजनिकपणे विराटबाबत काही बोलत नाही. तिच्या नेमका उलटा विराट आहे. तो नेहमीच सोशल मीडियात तिच्याबाबत बोलत असतो आणि फोटोही शेअर करत असतो.