Tejashri Pradhan and Shivani Boakar: कलाकारांमध्ये कायमच एक स्पर्धा रंगलेली असते आणि त्यातून त्यांच्या एक वेगळंच शीतयुद्ध सुरू असते अशाही अनेकदा रंगताना दिसतात. परंतु व्यावसायिकदृष्ट्या ही स्पर्धा ग्राह्य धरली तर प्रत्यक्षात या अभिनेत्री मात्र या एकमेकांच्या जिवलग मैत्रीणीही असतात. सध्या अशाच दोन अभिनेत्रींची चर्चा रंगलेली आहे. या दोन अभिनेत्री नुकत्याच ट्रेकिंगला एकत्र गेल्या होत्या. यावेळी त्या फक्त दोघीच होत्या. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये जोरात चर्चा रंगल्या आहे. तुम्ही म्हणाल की यात काय आहे चर्चा करण्यासारखं? परंतु अनेक नेटकऱ्यांनी त्याला थेट प्रश्न विचारला आहे की, अरे तुम्ही दोघी मैत्रीणी कधी झालात? सध्या त्यांनी आपले हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर यावेळी त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी धम्माल कमेंट्स केल्या आहेत.
अनेकदा शुटिंगच्या निमित्तानंही अनेकदा अभिनेत्री या भेटताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. परंतु आम्ही ज्या अभिनेत्रींबद्दल बोलत आहोत त्या चक्क कुठल्या शुटिंगसाठी नाही तर मस्त पावसाळा एन्जॉय करण्यासाठी एकत्र जमल्या आहेत. त्यामुळे त्या दोघींची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी पुरतं भांडावून सोडलं आहे. या दोघी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तेजश्री प्रधान आणि शिवानी बावकर आहेत. त्यांच्या अभिनयाची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्याचबरोबर त्यांचे फॅन फॉलोईंगही खूप आहे त्यामुळे सध्या त्यांच्या फोटोवरून चर्चांना जोरात उधाण आलं आहे. नक्की पाहुया नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा - चंकी पांडेच्या लेकीचे प्रताप; स्पेनच्या भर रस्त्यात 'या' अभिनेत्यासोबत झाली इतकी रोमॅण्टिक की...
''मी माझ्या लाडक्या मैत्रिणीबरोबर जंगलात फिरतेय…” तेजश्री प्रधाननं आपल्या इन्टाग्राम पेजवरून ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यावरून एका युझरनं लिहिलंय की, ''तुम्ही दोघी मैत्रीणी कधी झालात, कळलंच नाही.'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''तूला सांगणार होते कधी मैत्रीणी झाल्या पण राहून गेलं त्यांच्याकडून''. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तेव्हा ट्रेकिंग हे तरूणाईसाठी अगदी मस्ट आहे. तेव्हा सध्या तुम्ही जर का या ठिकाणीची निवड करणार असाल तर हे ठिकाण मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. लोकलचा प्रवास मिळून तुम्ही 2-3 तासात पोहचू शकतात.