Raj Kapoor Would Have Not Seen Karisma's Face : दिग्गज अभिनेता राज कपूर यांना बॉलिवूडचे शो मॅन म्हणायचे. त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासोबत दिग्दर्शन देखील केलं आहे. राज कपूर यांनी अनेक अभिनेत्रींचं करिअर घडवलं आहे. त्यासाठी ते ओळखले जातात. इतर अभिनेत्रींचं या क्षेत्रात करिअर करण्यासाठी ओळख मिळवून देण्यात मदत केली असली तरी देखील ते त्यांच्या घरातील सूना आणि मुलींना ग्लॅमरच्या क्षेत्रात येण्याच्या विरोधात होते.
राज कपूर तर त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करतं होते, पण कपूर कुटुंबात त्यांच्या शब्दा पुढे जाण्याची कोणाची इतकी हिम्मत झाली नाही. जेव्हा त्यांची नात करिश्मा कपूरचा जन्म झाला तेव्हा त्यांनी सून बबीता समोर एक अशी विचित्र अट ठेवली, जी ऐकूण सगळ्यांच आश्चर्य झालं. बबीता कोण आहेत असा प्रश्न असेल तर त्या राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर यांची पत्नी आहे. रणधीर कपूर आणि बबीता यांनी 1971 मध्ये लग्न केलं. 1974 मध्ये बबीता यांनी करिश्माला जन्म दिला.
खरंतर करिश्माच्या जन्मानंतर राज कपूर यांनी त्यांना पाहण्यासाठी एक विचित्र अट ठेवली होती. राज कपूर यांचं पुस्तक बूक: द वन अॅन्ड ओनली शोमॅनमध्ये बबीता कपूरसोबतच्या त्यांच्या त्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की 'जेव्हा लोलोचा जन्म झाला होता, तेव्हा संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपस्थित होते. फक्त माझे सासरे तिथे उपस्थित नव्हते. त्यांनी म्हटलं की त्यांनी सांगितलं होतं की नुकत्याच जन्म झालेल्या बाळाला तेव्हाच भेटणार, जर त्या बाळाचे डोळे हे निळे असतील. देवाच्या क्रुपेनं लोलोचे डोळे निळ्या रंगाचे होते, जसे माझ्या सासऱ्यांचे होते.'
हेही वाचा : आलिया भट्टनं नवरा रणबीर कपूरची हेरगिरी केली? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा
करिश्मा कपूर इंडियन चित्रपटसृष्टीतील सगळ्यात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. 90 च्या दशकातील प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंत ही करिश्मा होती. बबीता यांनी देखील सांगितलं की 'जेव्हा लोलो तिच्या आजोबांना सांगायची की तिला अभिनेत्री व्हायचं आहे, तेव्हा ते नेहमीच बोलायचे की एक दिवस तू मोठी अभिनेत्री होशील. या पुस्तकात करिश्मानं देखील सांगितलं की 'जेव्हा तिनं खरंच त्यांना जाऊन सांगितलं की मला अभिनेत्री व्हायचं आहे तेव्हा त्यांनी तिला सल्ला दिला की कलाकारांचं आयुष्य हे नेहमीत फुलांसारखं सुंदर नसतं. इथे काट्यांवर चालावं लागतं आणि मातीत सुंदर फुलांसारखं पुढे जावं लागतं.'