R. Madhavan Birthday: आर. माधवन या तुमच्या आमच्या लाडक्या अभिनेत्याचा आज 53 वा वाढदिवस आहे. गेली दोन दशक आर. माधवन हा अभिनेता (R. Madhavan Movies) आपल्या सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. मागील वर्षी त्याचा रॉकेट्री हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याची सर्वत्र चर्चां रंगली होती. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. या चित्रपटाबद्दल आर. माधवनला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळे आर. माधवनचीही चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु तुम्हाला माहितीये का की त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचे लव्ह स्टोरीही तितकीच रंजक आहे. तेव्हा आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या हटके लव्ह स्टोरीबद्दल.
तुम्हाला ऐकून माहितीच असेल की आर. माधवनची बायको ही मराठी आहे. नसेल माहिती तर या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आर. माधवन कोल्हापूरच्या मुलीच्या प्रेमात कसा काय पडला? आर. माधवन हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय आहे. तो कायमच आपल्या (R. Madhavan Marathi Wife) कामाबद्दल आणि आपल्या पर्सनल लाईफबद्दलही आपल्या चाहत्यांना अपडेट करत असतो. त्याचा मुलगा आज क्रिडा क्षेत्रात सक्रिय आहे. त्यांच्या प्रत्येक अचिव्हमेंटबद्दल तो चाहत्यांना अपडेट करत असतो. त्यातून तो आपल्या परिवारासह आपल्या पत्नीचे आणि आपल्या मुलाचेही फोटो इन्टाग्रामवर शेअर करतो. परंतु तुम्हाला हे माहितीये का की, आर. माधवननं आपल्याच विद्यार्थीनीशीच लग्न होते.
चला तर सुरूवात करूया त्याच्या कॉलेज लाईफपासून. जेव्हा आर. माधवन यानं मुंबईच्या केसी कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले त्यानंतर तो कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षण घ्यायला गेला होता. यासाठी तो पाच वर्ष कोल्हापूरात होता. त्यावेळी तो राजाराम हॉस्टेल आणि मग राजारामपुरीत भाड्याच्या घरात राहा होतात. त्यावेळी त्यानं तिथेच आपलं शिक्षण पुर्ण केल्यावर शिक्षण म्हणून कोल्हापूरात नोकरी करू लागला होता.
हेही वाचा - तेरे चेहरे मे वो जादू है....; 71 व्या वर्षी Zeenat Aman यांचं फोटोशूट
त्यानं यावेळी कोल्हापूरमध्ये पब्लिक स्पीकिंगचे क्लासेस सुरू केले होते. त्यानं यावेळी एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेत त्याची आणि सरिता बिर्जे हिच्याशी भेट झाली होती. सरिता यांना हवाईसुंदरी व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी 1991 मध्ये आर. माधवन यांच्या क्लास लावला होता. त्यानंतर त्यांना या क्लासचा फायदा झाला होता. त्यामुळे त्यांना आर माधवन यांना थॅक्स डिनरसाठी घरी बोलावले होते. तिथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली होती.
त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढली आणि मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये लग्न केले. ही गोष्ट आहे आर. माधवन बॉलिवूडमध्ये येण्याअगोदरची.