मुंबई : 'मन', 'दिल से', 'बॉम्बे', 'अकेले हम अकेले तुम' अशा अनेक सिनेमांतून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री मनीषा कोइराला एका प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. मन सिनेमातील तिची 'प्रिया' ही भूमिका चाहत्यांना खूप आवडली. यामध्ये ती आमिर खानसोबत दिसली होती. मनीषाचं प्रोफेशन आयुष्य तर जोरदार होतं, पण खासगी आयुष्यात मात्र ती कायम प्रेमापासून वंचित राहिली.
लग्नापूर्वी मनीषाचे एक दोन नव्हे तर 12 प्रसिद्ध व्यक्तींसोबत प्रेमसंबंध होते. सौंदर्याच्या बळावर चाहत्यांना भुरळ घालणारी ही अभिनेत्री 90 च्या दशकात चाहत्यांना अक्षरश: वेड लावत होती.
सर्वात पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेता विवेक मुशरन याला तिनं डेट केलं. पण, पुढे हे नातं फार काळ तग धरु शकलं नाही. चर्चा तेव्हा वाढली, जेव्हा मनिषाचं नाव अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी जोडलं गेलं.
'खामोशी' या सिनेमामध्ये नानांनी तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. पण हे नातं देखील अधिक काळ टिकू शकलं नाही. यांच्या नात्यात अभिनेत्री आएशा झुल्का हिची एंट्री झाली आणि मनिषाला हादरा बसला.
पुढे मनिषानं नशेचा आधार घेतला आणि तिची तब्येत खालावत गेली. 2010 मध्ये तिनं नेपाळी व्यावसायिक सम्राट दहल याच्याशी लग्न केलं. पण, या नात्यात झालेल्या मतभेदांमुळं दोघांचं नातं तुटलं.
माझ्या नशिबात पुरुषाचं प्रेम नाही, असं म्हणणारी ही अभिनेत्री आजही एकटीच आयुष्य जगतेय. पण, आता मात्र तिला सकारात्मकतेची मोलाची साथ मिळतेय.