४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे होणार? हे आहे या मागचं कारण

मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर या दोघांच्या नात्याला जवळपास 4 वर्षे उलटून गेली आहेत.

Updated: May 3, 2022, 06:58 PM IST
४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे होणार? हे आहे या मागचं कारण title=

मुंबई : मलायका अरोरा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलायका अरोराने बॉलिवूडमध्ये अनेक आयटम साँग केले आहे. आता प्रत्येक बॉलिवूड अभिनेत्री मलायकाच्या डान्स स्टेप्स कॉपी करू लागल्या आहेत. मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

या दोघांच्या नात्याला जवळपास 4 वर्षे उलटून गेली आहेत. या दोघांच्या नात्याची चर्चा सर्वत्र आहे. नुकतीच, दोन्ही कपलबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे की, 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघंही वेगळे होणार आहेत.  

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप 
मलायका अरोरा ही अशी अभिनेत्री आहे जी, नेहमीच पॉजिटीव्ह असते. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर, तिने स्वतःची काळजी घेतली आणि तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात सध्या काही चांगलं चाललेलं नाही.

दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद सुरु आहे आणि मलायकाने स्वतःला घरात कैद करून घेतल्याचं बोललं जात आहे. असंही म्हटलं जातं आहे की, अभिनेत्री कोणालाही भेटू इच्छित नाही. मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या खूप जवळ होती. पण काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर त्याची बहीण रिया कपूरच्या घरी डिनरसाठी गेला होता.

असं म्हटलं जातं. यादरम्यान तो मलायका अरोराच्या घरी गेला नाही किंवा तिच्याशी कोणत्याही प्रकारे बोलला नाही. रिया कपूर आणि मलायका अरोरा यांचं घर शेजारी आहे. अर्जुन कपूर आणि मलायका लवकरच वेगळे होणार असल्याची बातमी समोर येत आहे. ४ वर्षांचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे.  या संपूर्ण प्रकरणावर अद्याप तरी या कपलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हे कितपत खरं आहे हे अद्याप समजलेलं नाही.