मुंबई : अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बेबोचे चाहते आता सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर करिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. पण प्रत्येकाचं लक्ष तिच्या इन्स्टाग्रामवरील कॅप्शनकडे आहे. सध्यातिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
करिना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सांगितले की, तिचा छोटा मुलगा जेह अली खान 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचा भाग आहे, त्यामुळे हा सिनेमा अभिनेत्रीसाठी खूप खास आहे.
करिना म्हणते, ''एक महामारी, दोन लॉकडाउन आणि नंतर एक बाळ. माझ्या सर्वात खास सिनेमांपैकी एक... कारण माझा जे बाबा देखील या सिनेमाचा एक भाग आहे.' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान करिना गरोदर असल्यामुळे करिनासाठी हा सिनेमा प्रचंड खास आहे.
करिनाने यासाठी खास व्यक्तींचे आभार देखील मानले आहेत. 'अद्वैत आणि आमिरचे आभार, ज्यांनी यात फक्त मलाच नाही तर जेहला देखील सिनेमात घेतलं, ही अशी गोष्ट आहे जी मी कधीही विसरू शकत नाही.. असं देखील करिना म्हणाली.
सांगायचं झालं तर, 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करीना कपूर गर्भवती होती. गेल्या वर्षी 21 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांचा जन्म झाला.
करिनानेही तिच्या गरोदरपणाच्या दिवसांमध्ये काम केलं आणि सिनेमाचं शूट पूर्ण केले. एवढेच नाही तर करिनाने जेहच्या डिलिव्हरीनंतरही सिनेमाचे अनेक भाग शूट केले.