The Kapil Sharma Show : असं म्हणतात की संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. कारण, आयुष्यात सर्वकाही अगदी सोप्या पद्धतीनं मिळालं असतं तर, या जगण्याला काही अर्थच राहिला नसता. अगदी मोठ्यातल्या मोठ्या कलाकारालाही जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर संघर्षाचा सामना करावा लागला आहे. पण, संघर्षही किती असावा? 'द कपिल शर्मा शो' आणि त्यापूर्वी काही विनोदी कार्यक्रमांमधून झळकणाऱ्या एका विनोदी कलारासोबत जे घडलंयते पाहून तुम्हीही असाच प्रश्न विचाराल. ऐन तारुण्यात जेव्हा प्रेक्षकांच्या पसंतीचा अनुभव त्याला येत होता, जेव्हा लोकप्रियतेच्या वळणावरून त्याचा कारकिर्दीचा प्रवास सुरु होता त्यावेळी नियतीनं त्याच्यासमोर इतकी आव्हानं उभी केली की यातून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ द्यावा लागला.
कारकीर्दीतील संघर्षापेक्षा इथं त्याचा स्वत:शीच एक वेगळा संघर्ष सुरु होता. कारकिर्दीनं तर दाखवायची ती सर्व आव्हानं समोर मांडली, त्यातच त्याच्यावर डिप्रेशन म्हणजेच नैराश्य (Depression), बायपोलर डिसऑर्डर (Bipolar Disorder) आणि सब्सटंन्स अब्यूज (Substance Abuse) या साऱ्याचा मारा झाला. एका मुलाखतीत आपल्या जीवनातील या संपूर्ण काळावर भाष्य करणारा हा अभिनेता आहे सिद्धार्थ सागर (Siddharth Sagar).
2018 मध्ये ‘कॉमेडी सर्कस’ (Comedy Circus) या कार्यक्रमानंतर सिद्धार्थ दिसेनासा झाला. यादरम्यान आपण 18 औषधं घेत असल्याचं सांगत हा तोच काळ होता जेव्हा मला एकटं वाटत होतं, मी बायपोलर डिसऑर्डरचा सामना करत होतो असा खुलासा केला. विचित्र स्वप्न पडणं, सतत घाबरणं आणि तत्सम गोष्टी त्याच्यासोबत घडत होता. पण, ते दिवस अखेर सरले आणि वर्षभरापासून मला असा कोणताही त्रास नाही हे सांगताना त्यांनं सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोक जेव्हा बाहरेचं खाणं खातात तेव्हा त्यांच्यामध्ये नकारात्मक उर्जा निर्णा होते. पैसा, प्रसिद्धी आणि यश सर्वकाही मिळतं. पण, काहीतरी मिळवण्यासाठी खूप काही गमवावं लागतं हे सांगताना तुम्ही शरीर आणि मनाकडे, मेंदूकडे दुर्लक्ष केलं तर एखादी महत्त्वाची गोष्ट गमावताय हा महत्त्वाचा संदेश त्यानं सर्वांनाच दिला. शरीर आणि मेंदूलाही आरामाची गरज असते ही बाब त्यानं सध्या धकाधकीचं आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकालाच सांगितली.