मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना झाला अजून नेपोटिझमवरील चर्चा संपलेली नाही. काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना नेपोटिझमवर जोरदार चर्चा करत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने असा दावा केला आहे की, तिने केलेले आरोप जर खोटे ठरले तर ती तिला सन्मानित केलेला पद्मश्री पुरस्कार परत करेल. याबाबत पुन्हा एकदा कंगनाने करण जोहर आणि यशराज फिल्मचे मालक आदित्य चोप्रावर निशाणा साधला आहे.
करण जोहरबद्दल बोलायचं झालं तर कंगनाने असं म्हटलंय की, सुशांत आपल्या सिनेमांबद्दल अतिशय आनंदी होता. खूप काळ स्ट्रगल केल्यानंतर त्याला धोनी सारखा सिनेमा मिळाला. आता देखील आदित्य चोप्रा सुशांतसोबत काम करण्यात इच्छुक नव्हते. याचं एकमेव कारण होतं करण जोहर. जो आदित्य चोप्राचा खूप चांगला मित्र आहे. सुशांतने यशराज फिल्मसोबत तीन सिनेमांच कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. ज्यानंतरही आदित्य चोप्राने त्याला एक फ्लॉप अभिनेता म्हटलं.
मला देखील या इंडस्ट्रीत १४ वर्षे झाली. आपली ओळख वाढल्यानंतर मी देखील दिग्दर्शन आणि फिल्म मेकिंगमध्ये आपलं नशिब अनुभवलं. धोनीसारखा सिनेमा हिट होऊनही असं नेमकं काय झालं की, त्याला ड्राइव सारख्या सिनेमा बायर मिळाला नाही. करण जोहरने असं का केलं. असं ऐकलं होतं की, सुशांतला करण जोहरने धमकी दिली होती की, तुझा ड्राइव सिनेमा सिनेमाघरात प्रदर्शित होणार नाही.
आदित्य चोप्राबद्दल सांगताना कंगना बोलते की, त्यावेळी यशराज सिनेमाने रणवीर सिंह आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनाही आपल्या सिनेमाकरता साईन केलं. आता संजय लीला भन्साळी म्हणतात की, सुशांत सिंह सोबत काम करण्यासाठी मी ५ वर्षे वाट पाहिली.
पटनाच्या एका मुलाने संजय लीला भन्साळी सारख्या माणसाचं मन जिंकल. पण तो आदित्य चोप्रासाठी फ्लॉप अभिनेता ठरला. यशराजचे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला पूर्णपणे अडकवून टाकतात. तुम्ही त्यांच्या मर्जीशिवाय काम करू शकत नाही. यशराज फिल्मने सुशांतला 'रामलीला' सिनेमा करायला परवानगी दिली नाही. त्यानंतर तो सिनेमा रणवीर सिंहसोबत करण्यात आला. रणवीरला पुन्हा यशराज फिल्मकडून 'बाजीराव मस्तानी' करता परवानगी मिळते. मात्र सुशांतला मिळत नाही. कारण त्याला त्यांची मर्जी राखता आली नाही.