kajol transformation: सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त कोणीच चर्चा असेल तर ती म्हणजे काजोल हिची. काजोलबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसते. त्याचसोबत तिच्या मुलीच्याही अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते. काजोलला बॉलिवूडमध्ये 30 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यातून तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. काजोलनं अनेकदा असा खुलासा केला होता की तिला तिच्या रूपावरून टोमणे ऐकावे लागायचे. त्यामुळे तिनं स्कीन लाईटिंग सर्जरी करून घेतली आहे परंतु यावरून अनेकदा मतमतांतरे दिसली आहेत. परंतु तिनं ही सर्जरी केली आहे की नाही हा भाग सोडला तरीसुद्धा गेल्या तीस वर्षांमध्ये तिनं कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते.
'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें' ते लस्ट स्टोरीपर्यंत काजोलनं आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. बोल्ड आणि ब्युटीफुल अशा अभिनयाचे दर्शन तिनं आपल्या प्रत्येक भुमिकेतून दिले आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अजय देवगण आणि तिच्या कमेस्ट्रीबद्दलही अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. त्याच्या याच ट्रान्सफॉर्मेशनचं अनेकदा कौतुकही केलं जातं. त्यामुळे सध्या काजोल चर्चेत आली आहे. तेव्हा काजोल ही आपल्या भुवयांसाठी ओळखली जायची. आजही तिची ही ओळख कायम आहे. ज्या मुलींना अशा चिकटून भुवया होत्या त्यांच्यासाठी आपणच काजोलच आहोत याची क्रेझ मिरवण्याची चांगलीच संधी होती. त्यामुळे 80-90 ची तरूणपिढी तिच्या या साध्या पण खऱ्या लुकवर कायमच फिदा असायचे.
हेही वाचा - बॉलिवूडकडून सिक्वेल्सची मेजवानी; Stree 2 चा पहिला लूक प्रदर्शित... शुटिंगला सुरूवात
काजोलच्या स्किन टोन सर्जरीबद्दल अनेकदा चर्चा रंगते परंतु तिनं एका मुलाखतीतून खुलासा केला होता की, तिनं कोणतीच सर्जरी केली नसून तो सावळेपणा नाही तर उन्हामुळे आलेलं टॅनिंग होतं. तिनं अशी कुठल्याच प्रकारची स्कीन टोन सर्जरी केलेली नाही. तर आपल्याला आता उन्हात जास्त काम करावे लागत नाही म्हणून मी आता टॅन नाही असंही तिनं सांगितले होते.
आपल्या एका मुलाखतीत तिनं असंही म्हटले होते की, तिला तिच्या स्कीन टोनवरून आणि तिच्या जाडेपणावरून अनेकदा हिणवलं गेलं आहे. त्यामुळे तिला फार मोठ्या प्रमाणात याचा सामना करावा लागला होता.