वरूणवर भारी पडला श्रद्धाचा निशाणा

चित्रपटातील 'Illegal Weapon 2.0' गाणं प्रदर्शित

Updated: Jan 5, 2020, 06:37 PM IST
वरूणवर भारी पडला श्रद्धाचा निशाणा title=

मुंबई : अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर, नोरा फतेहीचा बहुप्रतिक्षित 'स्ट्रीट डान्सर ३ डी' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलर प्रदर्शनानंतर चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या चित्रपटामधील गाणी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहेत. 'गर्मी सॉन्ग' हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर आता Illegal Weapon 2.0 या गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. 

Illegal Weapon 2.0 गाणं जॅस्मिन सँडल्स आणि गॅरी संधू यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. तर हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर त्यातीत गाण्यांना देखील चाहते डोक्यावर घेताना दिसत आहे. 

'स्ट्रीट डान्सर ३ डी' (Street Dancer 3D) चित्रपटामध्ये वरूण आणि नोरा शिवाय अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात ती पाकिस्तानी डान्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

त्याचप्रमाणे 'एबीसीडी'च्या दोन्ही भागातले नृत्य कलाकार आपल्या कौशल्याने चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. २४ जानेवारी २०२० रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.