मुंबई : हॉलिवूड चित्रपट पाहिला का, असं म्हटलं असता अनेकांचं उत्तर होकारार्थी असून, त्यामध्ये टायटॅनिक या चित्रपटाचं नाव अग्रस्थानी असतं. लिओनार्दो दी कॅप्रिओ आणि केट विन्स्लेट यांनी साकारलेल्या जॅक, रोझ या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.
जवळपास वर्षांपूर्वी, म्हणजेच 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं, त्यात साकारल्या गेलेल्या एका करुण प्रेमकहाणीनं प्रत्येकाच्याच मनाचा ठाव घेताला. या एका चित्रपटानं त्यातील कलाकारांना रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. आजही Titanic आणि त्यातील रोझ अनेकांच्या काळजाचा ठाव घेते.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रोझ म्हणजेच अभिनेत्री केट विन्स्लेट बरीच वेगळी दिसते. वाढतं वय केटच्याही चेहऱ्यावर दिसत असलं तरीही शब्दांहतही न मांडता येणारं तिचं तेज काळजाचा ठाव घेतंय हे नक्की.
नुकतंच केटनं, Emmy Awards 2021 मध्ये हजेरी लावली होती. या सोहळ्यामध्ये तिला आऊटस्टँडिंग अॅक्ट्रेस या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 'Mare of Easttown' या वेब सीरिजमधील दमदार परफॉर्मन्ससाठी केटला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्कार मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
'टायटॅनिक'च्या निमित्तानं केट आणि लिओनार्दो दी कॅप्रिओ या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. साऱ्या जगात ही नावं ओळखली जाऊ लागली. आता जवळपास 24 वर्षांनंतर जेव्हा हे चेहरे प्रेक्षकांसमोर येतात तेव्हाही त्यांना तेच प्रेम मिळतं आणि आपला आवडता अभिनेका किंवा अभिनेत्री उतारवयात आल्याचं पाहून अनेकांचे डोळेही पाणावतात.