मुंबई:अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'भारत'चे टीजर लवकरच प्रदर्शित होणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाचे टीजर २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमान खान, कटरीना कैफ, तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर सिनेमात झळकणार आहेत. भारत सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. निर्माता अतुल अग्निहोत्रीने ट्विटरवर भारत सिनेमाच्या टीजरची एक झलक शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करत अतुल अग्निहोत्रीने Countdown begins असे कॅप्शन दिले आहे.
Countdown begins @bharat_thefilm #Teaser pic.twitter.com/4ywfRPXa6g
— Atul Agnihotri (@atulreellife) January 16, 2019
या व्हिडिओमध्ये ढोल त्याच बरोबर लोकांचा गोंगाट सुध्दा ऐकायला येत आहे आणि झेंडा फडकताना दिसतो आहे. सिनेमाच्या टीजरची पहिली झलक सलमानच्या वाढदिवसादिनी शेअर केली जाणार होती. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही.दिग्दर्शक अली अब्बास जफरने भारत सिनेमाचा टीजर खास दिनी शेअर करणार असल्याचे ट्वीट करुन सांगितले. सलमान खानच्या चाहत्यांना ऑल द बेस्ट सांगत, नाराज होण्याचे काही कारण नाही. भाईच्या जन्मदिनी भारत सिनेमाची कोणतीही गोष्ट रिलीज केली जाणार नव्हती. सिनेमाचे नाव भारत आहे, तर प्रदर्शनाची तारीखही खास असेल.
भारत सिनेमा २०१९ मध्ये ईदला रिलीज होणार आहे. टीजरची एक झलक पाहून अंदाज लावू शकतो की सिनेमा किती धमाकेदार असू शकतो. २०१८ मध्ये आलेल्या रेस-३ चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही. अली अब्बस जफरसोबत सलमानचा तिसरा सिनेमा आहे. याआधी सुल्तान आणि टाइगर जिंदा है मध्य़े दोघांनी एकत्र काम केले होते. भारत सिनेमात सलमान ५ वेगवेगळ्या भूमिकेतून चाहत्यांच्या समोर येणार आहे. मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सिनेमाचे शेवटचे शेड्यूल शूट होत आहे