Fact Check : ऐश्वर्या-अभिषेक लवकरच घेणार घटस्फोट?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Updated: Jan 4, 2023, 04:57 PM IST
Fact Check : ऐश्वर्या-अभिषेक लवकरच घेणार घटस्फोट? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्या दोघांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यात ऐश्वर्या ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. 

ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा आहे. लोकं अभिषेक बच्चनला भाग्यवान मानतात की, तो इतक्या सुंदर अभिनेत्रीचा पती आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याला 10 वर्षांची आराध्या नावाची मुलगी आहे. या दोन्ही स्टार्सच्या विभक्त झाल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूधील सर्वोत्तम जोडपं मानलं जातं. 5200 कोटींचा मालक असूनही अभिषेक बच्चन वैवाहिक जीवन आनंदित जगत आहे. अभिषेक बच्चनला बॉलिवूडमध्ये कमी चित्रपट मिळतात. मात्र त्याच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळतं. अभिषेकचे बहुतेक सगळेच चित्रपट हिट ठरले आहेत. 

अभिषेक बच्चनचे नाव अनेक बड्या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं असलं तरी त्याने विश्व सुंदरी पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न करून अभिषेक बच्चनने सर्वांना आश्चर्यचकित केलं. 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झालं.. लग्नाच्या 15 वर्षानंतर आता त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी समोर येत आहे. जाणून घेऊया या बातमीमागचं सत्य काय आहे?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ही पहिलीच वेळ नाही की, याआधीही अनेक अभिनेत्यांच्या मृत्यूपासून लग्नापर्यंत खोट्या अफवा पसरवण्यात आल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या पूर्णपणे अफवा आहेत. या दोघांच्या प्रेमात अफाट शक्ती आहे, त्यामुळे वेगळे होण्याचा प्रश्नच येत नाही.

नुकतीच अभिषेकने एक मुलाखत दिली ज्यात अभिषेक म्हणाला, ऐश्वर्या आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम करतो. ऐश खूप सपोर्टिव्ह आहे. ती नेहमीच माझ्या वाईट काळातही माझ्यापाठिशी खंबीरपणे उभी असते.'' त्यामुळे त्यांची ही केमिस्ट्री पाहता त्यांच्यात सगळं काही छान सुरुये.  मात्र समोर आलेली ही बातमी पुर्णपणे खोटी असून त्यात काहीच तत्थ नाहीये.  यादोघांना 11 वर्षांची मुलगी आहे. जिचं नाव आराध्या असं आहे.