'सलमान मला...' भाईजानचं नाव ऐकून मलायका अरोरा संतापली

मलायका अरोरा आजही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोराचं पहिलं लग्न सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत झालं होतं. 

Updated: Jan 28, 2023, 12:00 PM IST
'सलमान मला...'  भाईजानचं नाव ऐकून मलायका अरोरा संतापली   title=

मुंबई : मलायका अरोरा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलायका अरोराने बॉलिवूडमध्ये अनेक आयटम साँग केले आहे. आता प्रत्येक बॉलिवूड अभिनेत्री मलायकाच्या डान्स स्टेप्स कॉपी करू लागल्या आहेत. मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांच्या नात्याला जवळपास 4 वर्षे उलटून गेली आहेत. या दोघांच्या नात्याची चर्चा सर्वत्र आहे.

मलायका अरोरा आजही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोराचं पहिलं लग्न सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत झालं होतं. अरबाज खान आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक होते पण काही कारणांमुळे दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं नातं अरबाज खान आणि त्याच्या कुटुंबाशी जोडलेले राहिलं.

करिअरवर प्रश्न उपस्थित झाल्यावर मलायका अरोरा संतापली!
मलायका अरोराच्या चित्रपटांबाबत, इंडस्ट्रीमध्ये लोकं अनेकदा म्हणायचे की, मलायकाचं सिनेमात करिअर घडवण्यामागे सलमान खानचा हात होता. यावर संतापलेल्या मलायकाने प्रत्युत्तर दिलं. खरंतर, ड्रामा क्वीन राखी सावंतने मलायका अरोराची खिल्ली उडवली आणि सांगितलं की, सलमान खानच्या कुटुंबातील असल्याने मलायका अरोराला टीव्ही शोमध्ये आयटम गर्लचा टॅग कधीच मिळाला नाही.

मलायका अरोरा (Rakhi Sawant and Malaika Arora Controversy) बद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली होती की, ''खान कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळे तिला इंडस्ट्रीत अनेक संधी मिळाल्या. राखी सावंतचा डान्स व्हिडिओ ऐकल्यानंतर मलायका संतापली आणि म्हणाली, असं झालं असते तर मी सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात एक आयटम साँग करायला हवं होतं.  मी सेल्फ मेड आहे आणि यात सलमान खानचा कुठेच हात नाही...''