मुंबई : 'बाहुबली' हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा फक्त भारतातच नव्हे तर विदेशात ही बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे. बाहुबलीला पाहून चीनच्या अलीबाब पिक्चर्सने चीनी बाहुबली बनवण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास 726 करोड रुपये म्हणजे 75 करोड युआन गुंतवून चीनमधील पहिली सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा 'असुरा' तयार करण्यात आली. पण धक्कादायक बाब म्हणजे हा सिनेमा रिलीज होताच आपटला
'असुरा' हा सिनेमा फ्लॉप होताच अलीबाबाने पहिल्याच आठवड्यातून या सिनेमाला हटवलं आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी अवघ्या 50 करोडची कमाई केली आहे. अलीबाबाचा हा सिनेमा बौद्ध पौराणिक कथेवरून प्रेरित असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडिया अकाऊंटमधून माहिती देण्यात आली की, रविवारी 10 पर्यंत हा सिनेमा सिनेमागृहातून काढण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. या पोस्टमध्ये कंपन्यांनी माफी मागताना म्हटलं आहे की, आम्ही त्या लोकांची माफी मागतो ज्यांना हा सिनेमा पाहायचा आहे, पण ते हा सिनेमा पाहू शकणार नाही.
याव्यतिरिक्त आपण बाहुबली 2 बद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाला बनवण्यासाठी 250 करोड रुपये खर्च केले. पण या सिनेमाने फक्त एका आठवड्यातच 860 करोड रुपयांची कमाई केली आहे. 'असुरा' बद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाला बनवण्यासाठी 6 वर्ष लागली. सिनेमाने व्हिजुव्हल मेकर्सवर अधिक पैसे लावले असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सिनेमांत तब्बल 2400 सीनला स्पेशल इफेक्ट आहेत. ज्याचा रन टाइम 141 मिनिट आहे.