Sara Ali Khan on Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) आणि दुसरी पत्नी करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या वयात फक्त 13 वर्षांचं अंतर आहे. सारा अली खान ही सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांची मुलगी आहे. 2004 मध्ये सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये सैफ अली खानने दुसरं लग्न केलं.
करीना कपूर (Kareena Kapoor) सारा अली खानची सावत्र आई आहे. मात्र सावत्र आई असतानाही साराचं करीनाशी घट्ट नातं आहे. जेव्हा सैफ अली खानने करीनाशी लग्न केलं होतं, तेव्हा साराही त्यात सहभागी झाली होती. सारा आणि करीना यांच्या वयात 13 वर्षाचं अंतर आहे. दरम्यान, सारा अली खान करीनाला कोणत्या नावाने हाक मारते हे तुम्हाला माहिती आहे का?
करीनाने सारा अली खानला सांगितलं होतं की, तुझ्याकडे एक चांगली आई आहे, त्यामुळे तू मला एक चांगली मैत्रीण बनवू शकतेस. दरम्यान साराने करीनाला छोटी आई म्हणून हाक मारावी अशी सैफची इच्छा नव्हती. यामुळे सारा करीनाला नावाने किंवा K अशी हाक मारते.
1991 मध्ये सैफ आणि अमृता सिंग विवाहबंधनात अडकले होते. पहिल्या लग्नापासून दोघांनाही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहेत. लग्नाच्या 13 वर्षांनी 2004 मध्ये अमृता आणि सैफने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सारा आणि इब्राहिम आपल्या आईसह राहत होते.
2018 मध्ये सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्या चित्रपटातून सारा अली खानला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. साराने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सारा अली खान आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. 1993 मध्ये साराचा जन्म झाला. साराचा जन्म झाला तेव्हा अमृता सिंग 35 तर सैफ फक्त 23 वर्षांचा होता. दरम्यान सारा अली खान सध्या आपल्या चित्रपटांसह अफेअरमुळेही चर्चेत आहे. सारा अली खानचं नाव भारतीय क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जात असून अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे.