पतीवरुन मौनीची नजर हटेना, पाहा लग्नसोहळ्यातील पहिलाच फोटो पोस्ट करत मानले कोणाचे आभार...

सेलिब्रिटी मित्रांनीही गोव्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली. 

Updated: Jan 27, 2022, 11:17 AM IST
पतीवरुन मौनीची नजर हटेना, पाहा लग्नसोहळ्यातील पहिलाच फोटो पोस्ट करत मानले कोणाचे आभार...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्यानंतर अखेर अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या सोहळ्यांचे फोटोही आता व्हायरल होऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे आतापर्यंत मौनीनं तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा कोणताही फोटो शेअर केला नव्हता. (Mouni roy suraj nambiyar )

आता मात्र तिनं सूरजची ओळख साऱ्या जगाला करुन दिली आहे. प्रेमाचं हे नातं लग्नबंधनात बदलत असल्याचा आनंद मौनीला आणि सूरजलाही आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोंमधून हेच लक्षात येत आहे. जिथं सूरजवरुन मौनीची नजर हटता हटत नाहीये. 

आपल्या जिवाभावाचं माणूस अवघ्या काही तासांत आयुष्यभराचा जोडीदार होणार ही भावनाच तिच्या मनात घर करुन गेल्याचं लक्षात येत आहे. 

या आनंदाच्या क्षणांसाठी तिनं देवाचे मनापासून आभारही मानले आहेत. 

इथं मौनी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर सूरजनं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून, कॅज्युअल लूकला पसंती दिल्याचं कळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

सेलिब्रिटी वर्तुळातील या नव्या जोडीच्या लग्नासाठी काही सेलिब्रिटी मित्रांनीही गोव्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली. 

सूत्रांच्या माहितीनुसार मौनी आणि सूरज यांचा विवाहसोहळा बंगाली आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीनं पार पडणार आहे. तेव्हा आता या ड्रीम वेडिंगचे फोटो कधी पाहायला मिळतात याचीच उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.