मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
Film and Television Institute of India म्हणजेच एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी सोपवला असून, कामाच्या व्यापामुळे आणि एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाला दिलेल्या वेळामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी ट्विट करत सांगितलं.
'अतिशय मानाच्या अशा एफटीआयआयचं अध्यक्षपद भूषवणं ही माझ्यासाठी अतिशय मानाची बाब आणि एक सुवर्णसंधीच होती. ज्या संधीतून खूप काही शिकता आलं. पण, माझ्या काहा आंतरराष्ट्रीय कामांमुळे मी यापुढे या शिक्षणसंस्थेला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळेच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला आभारी....', असं ट्विट त्यांनी केलं.
एफटीआयआयकडूनही खेर यांच्या या निर्णयाविषयी माहिती देण्यात आली आहे.
It has been an honour, a privilege & a great learning experience to be the Chairman of the prestigious @FTIIOfficial. But because of my international assignments I won’t have much time to devote at the institute. Hence decided to send my resignation. Thank you. @Ra_THORe pic.twitter.com/lglcREeYM2
— Anupam Kher (@AnupamPKher) October 31, 2018
गजेंद्र चौहान यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर खेर यांनी ११ ऑक्टोबर, २०१७ मध्ये या संस्थेच्या अध्यपदाचा अधिभार सांभाळला होता.