Laal Singh Chadha Shows got Cancelled: लाल सिंग चड्ढा या चित्रपटाला सध्या सगळीकडून दणादणून विरोध होतो आहे. कालच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे मात्र असे असले तरी या चित्रपटाला झालेला विरोध पाहता चित्रपट रिलिज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा प्रत्ययही प्रत्यक्षातही दिसून आला आहे.
आमीरने या चित्रपटाचे फार जोरात प्रमोशन केले होते हा चित्रपट बॉयकोट करा म्हणून प्रेक्षकांकडून मागणी होत असताना, चित्रपटाच्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर आमीरने जाहीरपणे चित्रपट पाहण्याची विनंतीही केली होती. परंतु आमीरची ही विनवणीही निष्फळ झाल्याचे दिसून येते आहे.
लाल सिंग चड्ढाला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला थंड प्रतिसाद पाहून या चित्रपटाचे शो रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. बऱ्याच चित्रपटगृहांमध्ये शंभर ते दोनशे सीट्सवर केवळ दहा ते वीस प्रेक्षकच चित्रपटगृहांमध्ये होते. त्यामुळे लाल सिंग चड्ढा या चित्रपटासाठी हे संपुर्ण चित्र प्रचंड निराशाजनक ठरले.
अशी परिस्थिती असताना आता दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाचे 1300 शोज म्हणजेच स्क्रिन्स रद्द झाल्या असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे हा आमीर खान आणि चित्रपटातील कलाकारांसाठीच नाही तर पुर्ण बॉलीवूडला बसलेला धक्का आहे.
नुकत्याच एका संकेतस्थळाने याबाबत माहिती जाहीर केली आहे. अनेक मल्टिप्लेक्सेसमध्ये लाल सिंग चड्ढा चित्रपट फार चांगली कामगिरी करू न शकल्याने चित्रपटाचे शो कमी करण्याचा निर्णयही मल्टिप्लेक्सेसने घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे advanced booking देखील फार खास नव्हते. त्यातून आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरही प्रेक्षकांनी दाखवलेल्या थंड प्रतिसादामुळे चित्रपटगृह मालकांनी शोज रद्द केले आहे.
काय होती पहिल्या दिवसाची अवस्था...
आमिरचा हा चित्रपट देशभरातील सुमारे 3600 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता आणि पहिल्याच दिवशी त्याचे दहा हजारांहून अधिक शो झाले. बॉलीवूडला अपेक्षा होती की आमिरचा चित्रपट 20 कोटी रुपयांपेक्षा वर ओपनिंग करेल. पण हे होऊ शकले नाही. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार आमीर खानच्या लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन हे दोन्ही चित्रपट पहिल्याच दिवशी चांगली कमाई करू शकले नाहीत.