प्राजक्ता माळीच्या आधी या मराठी अभिनेत्रींचे बोल्ड सीन पाहून हैराण झाले होते प्रेक्षक

अनेक मराठी अभिनेत्रींनी आतापर्यंत बोल्ड सीन देऊन चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती.

Updated: May 25, 2022, 08:07 PM IST
प्राजक्ता माळीच्या आधी या मराठी अभिनेत्रींचे बोल्ड सीन पाहून हैराण झाले होते प्रेक्षक title=

मुंबई : सध्या एक मराठी वेब सीरीज चांगलीच चर्चेत आहे. रानबाजार (RanBazar) या वेब सीरीजमध्ये अनेक विषयांना हात घालण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. या वेब सीरीजमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे.  

रानबाजार ही वेब सीरीज दोन अभिनेत्रींच्या बोल्ड सीनमुळे चर्चेत आलीये. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांचा ट्रेलरमधला तो बोल्ड सीन्स चांगलात चर्चेत आहे.

मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिल्याची ही पहिलीच वेब सीरीज नाही. याआधी ही अनेक मराठी अभिनेत्रींना बोल्ड सीन देऊन चाहत्यांना धक्का दिला आहे.

अभिनेत्री प्रिया बापटने सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन दिला होता. ज्यामुळे ती बरीच चर्चेत आली होती.

अभिनेत्री अनुजा साठे हिने देखील ‘एक थी बेगम’ या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिलेत.