मुंबई : 2 ऑक्टोबर 2021 ला बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्याने त्यांचा आनंद अश्रूत बदलला. त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकला. तिथून आर्यन खानसह 6 जणांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात आर्यन खानकडून ड्रग्ज सापडलं नसल्याचं सुरुवातीपासूनच बोललं जात होतं. असं असतानाही आर्यन खानला ऑक्टोबरमध्ये 20 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यामुळे बराच गदारोळ झाला. मात्र, 28 मे 2022 रोजी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने त्याच्यावरील सर्व आरोप वगळण्यात आले.
ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खान किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही याबद्दल बोललं नाही, पण आता एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे.
आर्यन खानने ड्रग्ज प्रकरणावर तोडलं मौन
संजय सिंहच्या म्हणण्यानुसार, ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानशी बोलायला गेल्यावर स्टार किडने याबद्दल बोलण्यास संकोच केला आणि विचारलं की, तो त्याच लायकीचा आहे का? ड्रग्जच्या बाबतीत पहिल्यांदाच आर्यनने संजय सिंग यांना सांगितले होतं, ''सर, तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर बनवलं आहे. मी ड्रग्जमध्ये पैसे गुंतवतो. हे आरोप बिनबुडाचे नाहीत का? त्यांना माझ्याजवळ कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. असं असतानाही त्यांनी मला अटक केली.
साहेब, तुम्ही माझ्यावर खूप अन्याय केलात आणि माझी प्रतिष्ठा पणाला लावली. मला इतके आठवडे तुरुंगात का घालवावे लागले? मी खरच त्यास पात्र होतो का?" संजय सिंहने असंही सांगितलं की, रडत रडत शाहरुख खानने त्यांना सांगितलं की, लोकं त्याला 'राक्षस' म्हणून चित्रित करत आहेत, पण तो आणखी मजबूत होत आहे.