सलमानच्या वाढदिवसालाच बहिण अर्पिता देणार बाळाला जन्म

अर्पिताकडून सलमानला गोड भेट 

Updated: Dec 25, 2019, 09:32 PM IST
सलमानच्या वाढदिवसालाच बहिण अर्पिता देणार बाळाला जन्म title=

मुंबई : एकीकडे अभिनेता सलमान खान आणि बहिण अर्पिता खान शर्मा या दोन भावंडांचं प्रेम प्रत्येकाला माहित आहे. तर दुसरीकडे डिसेंबर महिना म्हणजे सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच. त्याला कारणही तसचं आहे. २७ डिसेंबर रोजी सलमान त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. परंतु यंदाच्या वर्षी तो त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही.

कारण त्याची बहिण अर्पिता २७ डिसेंबर रोजी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे २७ डिसेंबरला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय अर्पिताच्या भाईजानने घेतला आहे. तर सलमान २७ तारखेचा पूर्ण वेळ आपल्या बहिणीला देणार आहे. 

यंदाच्या वर्षी सलमान ५४व्या वर्षात पदार्पण करणार आहे. दर वर्षी तो त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करतो. परंतु आता तो त्याचा वाढदिवस पनवेलच्या फार्महाऊसमध्ये नाही तर, वांद्रे येथील सोहेल खानच्या घरी साजरा करणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#ahilsdairies

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, अर्पिता खान आणि पती आयुष शर्मा यांनी सलमानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याला गोड भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. २७ डिसेंबर रोजी अर्पिता सी-सेक्शनच्या माध्यमातून तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. 

अशात खान आणि शर्मा कुटुंबासाठी २७ डिसेंबर हा दिवस आनंदाचे क्षण घेऊन येणारा आहे. अर्पिता आणि आयुष जवळपास ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अर्पिता आणि आयुष ४ वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले. 

अर्पिता आणि आयुष यांचा १८ नोव्हेंबर २०१४ मध्ये हैदराबादमध्ये विवाहसोहळा पार पडला. गेल्या वर्षी लवयात्रि चित्रपटातून आयुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.