अभिनेत्री पतीला म्हणाली, 'तुझं कार्ड दे, नाहीतर बाय...' व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल  

Updated: Jan 15, 2022, 05:12 PM IST
अभिनेत्री पतीला म्हणाली, 'तुझं कार्ड दे, नाहीतर बाय...' व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर स्टारर 'जब वी मेट' चित्रपटाचे काही डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत. करीना घरातून पळून जाते आणि ती शाहिद कपूरला सांगते तेव्हाचा एक डायलॉग सध्या ट्रेंड करत आहे. इन्स्टाग्राम सध्या प्रत्येक जण यावर रिल्स तयार करत आहे. 

आता अभिनेत्री अनीता हसनंदानीने देखील (Anita Hassanandani) करीनाच्या डायलॉगवर व्हिडीओ तयार केला आहे. ज्यामध्ये ती मुलाला घेवून दिसत आहे आणि मी आता पळून जात असल्याचं सांगत आहे. पती शॉपिंग करू नको म्हणाल्यावर तिने एक व्हिडीओ तयार केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनिताने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'तुझं कार्ड मला दे नाही तर बाय...' असं म्हणत पती  रोहित रेड्डीला टॅग केलं आहे.  अनिता हसनंदानीच्या या मजेशीर व्हिडीओवर सेलिब्रिटी कमेंट करत आहेत.

अनिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो कायम शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनिताने टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे.