इंन्स्टाग्रामवर आदित्य रॉय कपूरचा डेब्यू

दोन दिवसांआधी आदित्यने त्याचे इंन्स्टाग्राम अकाऊंट ओपन केले आहे.   

Updated: Jan 30, 2019, 05:00 PM IST
इंन्स्टाग्रामवर आदित्य रॉय कपूरचा डेब्यू title=

मुंबई: बॉलिवूडमध्ये प्रत्येक स्टार हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. पण काही स्टार हे सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत नाहीत. ‘आशिकी 2’ स्टारर अभिनेता आदित्य रॉय कपूरला सुद्धा इंटरनेटचे जाळे आवडत नसल्याचे समोर आले आहे. आदित्य रॉय कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आदित्यने इंन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. दोन दिवसांआधी आदित्यने त्याचे इंन्स्टाग्राम अकाऊंट ओपन केले आहे. अकाऊंट ओपन करताच त्याचे 37.5k फॉलोअर्स झले असून आदित्यने पहिला फोटोही पोस्ट केला आहे.

या दोन मुलींमुळे मी इंन्स्टाग्रामवर आलो सांगत आदित्यने एक फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Just got convinced to do the impossible by these two lovely ladies . helloinstagram

A post shared by @ adityaroykapuryaitsme on

 

काही दिवसांपूर्वी अभिनेता वरुन धवनने आदित्य रॉय कपूरचा एक व्हिडिओ स्वत:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. ज्यामध्ये चाहते त्याला इंन्स्टाग्रामचे फायदे सांगत आहेत.

 

आदित्य रॉय कपूर 2009 साली 'लंडन ड्रीम्स' सिनेमात एक लहान भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्याने 2010 साली 'एक्शन रीप्ले' सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत झळकला होता. 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’ सिनेमाने आदित्यला एक नवीन ओळख मिळवून दिली. सध्या आदित्य मल्टीस्टारर सिनेमा 'कलंक'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.