2 लाख बजेट, 1 कोटी कलेक्शन, 'या' चित्रपटाने 3 वर्षे बॉक्स ऑफिसवर केले राज्य, 30 वर्षे कोणीही मोडू शकले नाही रेकॉर्ड

1943 मध्ये एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याने प्रेक्षकांवर अशी जादू केली की तो भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील पहिला ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट 3 वर्षे पडद्यावर राहिला.

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 20, 2024, 03:41 PM IST
2 लाख बजेट, 1 कोटी कलेक्शन, 'या' चित्रपटाने 3 वर्षे बॉक्स ऑफिसवर केले राज्य, 30 वर्षे कोणीही मोडू शकले नाही रेकॉर्ड title=

 Kismet : बॉलिवूडच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत. जे एकदा प्रदर्शित झाले की काही आठवडे किंवा काही महिने नाही तर एक ते दोन वर्षे पडद्यावर राहिले. अनेक चित्रपटांनी बजेटच्या कितीतरी पटीने अधिक कमाई करून अभिनेत्याला सुपरस्टार बनवले. असाच एक चित्रपट1943 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांवर इतकी जादू केली होती की भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. 

सर्वात कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाची कथा अशी होती की जेव्हा तो पडद्यावर आला तेव्हा लोक टाळ्या वाजवत राहिले आणि चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करत गेला. या चित्रपटाचे नाव 'किस्मत' आहे.  हा चित्रपट 1943 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अशोक कुमार मुख्य अभिनेता म्हणून दिसले होते आणि या चित्रपटानंतर ते बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार बनले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती.

इतक्या कोटींची केली होती कमाई

'किस्मत' हा चित्रपट बॉम्बे टॉकीज निर्मित आणि दिग्दर्शक ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित आहे. या चित्रपटाचे बजेट फक्त 2 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलीज झाल्यानंतर लोकांना हा चित्रपट इतका आवडला की या चित्रपटाने 1 कोटी रुपये कमवले. विशेष म्हणजे 'किस्मत' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 3 वर्षे पडद्यावर राहिला.

चित्रपटाची कथा 

हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्यामागे एक खास गोष्ट होती. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच वेगळ्या प्रकारची थीम दाखवण्यात आली होती. या चित्रपटात एका अविवाहित मुलीच्या गरोदर राहण्याची कथा होती. यामध्ये 'दूर हटो दुनियावालो हिंदुस्तान हमारा है' या देशभक्तीपर गाण्यालाही प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. प्रचंड हिट झाल्यानंतर 'किस्मत' हा चित्रपट तमिळ आणि तेलगूमध्ये ही बनवला गेला.

32 वर्षे तोडू शकले नाही या चित्रपटाचा रेकॉर्ड 

'किस्मत' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली. या चित्रपटाचा 32 वर्षे कोणीही रेकॉर्ड मोडू शकले नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 187 आठवडे सुरु होता.