1398000 रुपये.... क्रिकेटर अभिषेक शर्माच्या घड्याळात असं काय आहे खास?

Pooja Pawar
Feb 08,2025


भारताचा युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा याने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध 5 व्या टी 20 सामन्यात दमदार शतक ठोकलं.


अवघ्या 37 बॉलमध्ये अभिषेक शर्माने ठोकलेल्या या शतकाने ख्रिस गेल सह अनेकांचे विक्रम मोडले.


सध्या अभिषेक शर्मा चर्चेत आलाय तो त्याच्या एका घडाळ्यामुळे ज्याची किंमत ही जवळपास 1398000 रुपये इतकी आहे.


अभिषेकला रोलेक्स ब्रँडचं घड्याळ घालून स्पॉट करण्यात आलंय.


द इंडियन होरोलॉजीनुसार, अभिषेकच्या घडाळ्यात एक स्टेनलेस स्टील केस आहे जो रोलेक्स जुबली ब्रेसलेट सोबत जोडला गेलाय. यात मिनट मार्कसोबत सिल्वर-टोनचा काटा आणि काळ्या रंगाची डाय आहे. निळ्या आणि काळ्या रंगाचे हे घड्याळ एक मॉडर्न लुक देते.


घड्याळांची रिटेल किंमत ही जवळपास 9,90,000 रुपये आहे. तर याची बाजारातील किंमत 16,000 डॉलर आहे जे भारतीय रुपयांमध्ये ते 13,98,000 रुपये होतात.


अभिषेक सह अनेक सेलिब्रिटींना देखील यापूर्वी अशी महागडी घड्याळ घालून स्पॉट करण्यात आले आहे.

VIEW ALL

Read Next Story