पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घरा-घरात पोहचणाऱ्या 79 वर्षीय उषा नाडकर्णी आता 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहेत.
नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये उषाताईंना मास्टर शेफमध्ये येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. खरंतर, त्या कधीच कोणाकडून काम मागत नसल्याचं या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, एके दिवशी घरात बसले असताना अचानक त्यांना मास्टर शेफ शोमधून कॉल आला आणि त्यांनी उषाताईंना भेटायला बोलावले.
'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या टीमसोबत चर्चा करताना घरातील साधं जेवण बनवता येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
यानंतर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये प्रवेश देण्यात आला. घरी बसून राहण्यापेक्षा शोमध्ये काम केलेलं चांगलं म्हणून त्यांनी या शोसाठी होकार दिला असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.
अभिनेत्री उषाताईंनी सांगितलं, की या शोमध्ये त्यांना मजा येते आणि आव्हानेसुद्धा असतात. तसेच, या शोमध्ये आल्यानंतर त्यांनी बरेच नवे पदार्थ बनवण्यास शिकले असंसुद्धा त्या म्हणाल्या.
उषाताईंना शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवण्यास आवडते.
शोमधील परिक्षकांसोबत उषाताईंचे वाद होताना सुद्धा दिसत आहेत. याच कारणामुळे मागील आठवड्यात परिक्षकांनी उषाताईंनी बनवलेला पदार्थ चाखण्यास नकार दिला होता.