बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सिनेमा 100 कोटीची कमाई करताना दिसतात.
पण बॉलिवूडमध्ये 100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनमा आठवतोय का?
या सिनेमाने सर्वांना डान्स करायला भाग पाडलं. थिरकायला लावलं.
मिथून चक्रवर्तीचा डिस्को डान्सर हा तो सिनेमा होता.
ज्याने बॉलिवूडमध्ये सर्वात आधी 100 कोटींची कमाई केली.
या सिनेमात राजेश खन्नाने पहिल्यांदा कॅमियो रोल केला होता.
डिस्को डान्सर सिनेमा 2 कोटी रुपयांत बनला होता.
या सिनेमानंतर मिथून रातोरात स्टार बनले होते.
सिनेमातील जिमी जिमी जाम गाणे भारतासोबत चीन, जपानमध्येही हीट झाले.