दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण?

तेजश्री गायकवाड
Feb 08,2025


दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत आहेत. यामध्ये सर्वात धक्कादायक निकाल समोर आला आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले असून यामुळे आपला खूप मोठा धक्का मिळाला आहे.


अरविंद केजरीवाल यांचा 1200 मतांनी पराभव करणारे भाजपाचे परवेश वर्मा कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊयात.


भाजपचे माजी नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचा मुलगा परवेश हे दिल्लीतील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहेत.


1977 मध्ये जन्मलेल्या परवेश वर्मा यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेजमधून कला शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एमबीए केले.


2013 मध्ये त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. तेव्हा त्यांनी दिल्ली विधानसभेत मेहरौली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत विजय मिळवला.


2014 मध्ये पश्चिम दिल्ली संसदीय जागा जिंकून त्यांनी आणखी यश संपादन केले, त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला जिथे ते 5.78 लाखांच्या फरकाने विजयी झाले.


खासदार म्हणून त्यांच्या कार्यकाळात, ते संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते यांच्या संयुक्त समितीचे सदस्य राहिले आहेत आणि स्थायी समितीवर त्यांनी काम केले आहे.


2025 च्या दिल्ली निवडणुकीपूर्वी, परवेश वर्मा यांनी "केजरीवाल हटवा, राष्ट्र वाचवा" ही मोहीम सुरू केली आणि सरते शेवटी त्यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकली.

VIEW ALL

Read Next Story