अध्यात्मिक वर्तुळात कमालीची लोकप्रियता मिळवणारे वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी बऱ्याच गोष्टींवर आपली मतं मांडली आहेत.
याच प्रेमानंद महाराज यांना काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं एक प्रश्न केला. साधूसंत दाढी आणि केस वाढवतात यामागे काही विशेष कारण आहे का? हाच तो प्रश्न....
उत्तर देत प्रेमानंद महाराज म्हणाजे, संन्यासाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे केशवपन आणि दुसरी म्हणजे आजीवन केस वाढवणं किंवा 12 वर्षांनंतर केशवपन करणं.
केस कापणं साधुसंतांच्या जीवनशैलीचा भाग नसून ही क्रिया गृहस्थाश्रमात योग्य गणली जाते. जी मंडळी फक्त उपदेश, बोधपर संभाषण करतात त्यांच्यासाठी केस कापणं योग्य असतं. पण, वैराग्य स्वीकारणाऱ्यांकडे मात्र वरील दोनच पर्याय असतात.
गृहस्थाश्रमात असताना दाढी आणि केस वाढवणं म्हणजे पाखंड कृती करणं असं गृहित धरलं जातं असंही एका व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर देत महाराज म्हणाले. प्रेमानंद महाराज यांच्या मते गृहस्थाश्रमात गृहस्थाश्रमासारखंच वागावं आणि वैराग्य किंवा संन्यस्त जीवनात त्याच पद्धतीनं वागावं.