नवीन केसं उगवावे यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात.
औषधे किंवा घरगुती उपायांचा काहीच फायदा होत नसेल, त्यावेळी एका खास पद्धतीने भेंडीचे पाणी लावा.
भेंडीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. ही पोषक तत्वे शारीरिक आरोग्यासहीत केसांच्या आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर ठरतात.
भेंडीच्या पाण्यात व्हिटामिन A, C आणि K असतात. यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोहसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते.
भेंडीच्या पाण्याचा वापर केल्याने केस मुळांपासून मजबूत होतात. त्यामुळे केसांचे गळणे देखील कमी होते.
भेंडीच्या पाण्यातील गुणकारी व्हिटामिनमुळे नवीन केस उगवतात आणि केसांची वाढही खूप वेगाने होऊ लागते.
भेंडीतील चिकटपणा केसांसाठी नैसर्गिक कंडीशनर मानला जातो. त्यामुळे केस अगदी मऊ होतात.
भेंडीच्या पाण्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे वेगाने केस उगवतात आणि डोक्यावरील त्वचा कोरडी होत नाही.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)