फक्त जेवणच नव्हे, तर चहा, विविध प्रकारचे काढे, मुखवास यांमध्येही आल्याचा वापर केला जातो.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आलं फ्रिजमध्ये ठेवणं योग्य आहे की अयोग्य? तुम्हाला माहितीय?
एक ते दोन आठवड्यांमध्ये आल्याचा वापर करायचा असल्यास तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवू शकता.
आलं मुळातच सूर्यप्रकाशापासून दूर एखाद्या थंड आणि कोरड्या जागी ठेवावं. बाष्प असणाऱ्या ठिकाणी ठेवल्याल आल्यावर बुरशी येते.
आलं अधिक काळ टिकवायचं असल्यासच ते फ्रिजमध्ये ठेवावं. पण, तिथंही ते बाष्पाच्या संपर्कात येताच खराब होऊ लागतं.
आलं कधीही फ्रिजमध्ये ठेवताना एखादी हवाबंद पिशवी किंवा डब्यात ठेवावं. ज्यामध्ये बाष्प शोषण्यासाठी टिश्यू पेपर ठेवणं फायद्याचं.