सकाळच्या कॉफीमध्ये 'ही' एक गोष्ट मिसळा; होईल 4 जबरदस्त फायदे
भारतीयांची सकाळ चहा आणि कॉफीने होते.
दूध किंवा ब्लॅक कॉफी प्यायला अनेकांना आवडतं. पण तुम्हाला आरोग्यादायी कॉफीचं सेवन करायचं असेल तर त्या एक गोष्ट मिक्स करा.
तुम्ही कधी कॉफी विथ तूप याचं सेवन केलंय. बॉलिवूडमधील अनेक कलाकार कॉफीसोबत तूपचं सेवन करतात.
नॉर्मल कॉफीपेक्षा तुपा मिक्स कॉफी घेतल्यास तुम्हाला जास्त ऊर्जा मिळते. ही उर्जा दीर्घकाळ टिकते.
देशी तूर हे हेल्दी फॅट्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे ओमेगा फॅी अॅसिड्स आढळतात. ज्यामुळे आपलं हृदय निरोगी राहतं. चयापचय निरोगी राहत आणि मेंदू देखील योग्यरित्या कार्य करतं.
जर तुम्हाला अॅसिडीटीची समस्या असेल तर सकाळी तूप आणि कॉफीचं सेवन तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. तुपातील फॅटी अॅसिड अपचनाची समस्या दूर करतं आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
तूप - कॉफी शरीराला उबदार ठेवण्यास फायदेशीर ठरतं.
ही कॉफी बनवण्यासाठी प्रथम तुम्ही कॉफी काही वेळासाठी उकळून घ्या. नंतर त्यात एक चमचा तूप घाला.
थोडा वेळ ढवळ्यानंतर गॅस बंद करा. ही कॉफी गोड हवी असेल तर त्यात थोडं मध घाला.