महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेने पराभव झाल्यानंतर पंचाच्या निकालाविरोधात नाराज व्यक्त केली. त्यावेळी शिवराजने पंचाला लाथ मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला आहे.
यानंतर पोलीस हस्तक्षेप करत हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर शिवराजने कुस्ती सोडून बाहेर पडतो असे म्हटले आहे.
शिवराज राक्षे हा डबल महाराष्ट्र केसरी असून तो क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
शिवराजने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं होतं.
त्यानंतर धाराशिव येथे शिवराजने हर्षवर्धन सदगीर याला चीतपट करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला होता.
शिवराज हा राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा पैलवान आहे. त्याच्या घरातूनच कुस्तीचे धडे मिळाले आहेत. कारण वडिल आणि आजोबा यांनीही पैलवानकी केली होती.
कुटुंबाची इच्छा होती की शिवराजने महाराष्ट्र केसरीचं मैदान मारत चांदीची गदा पटकावी. त्यासाठी तो कात्रज येथे काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये सराव करतो.