10 घोड्यांचे बळ मिळवण्यासाठी नेपाळचे लोक कोणती वनौषधी खातात?
भारताच्या शेजारी वसलेल नेपाळ हे एक सुंदर आणि छोटा देश आहे. इथे बहुसंख्य लोक हे हिंदू आहेत.
नेपाळ हे नैसर्गिकरित्या अत्यंत समृद्ध असून इथे दुर्मिळ अशी आरोग्यासह फायदेशीर वनस्पती मिळतात.
या ठिकाणी हिमालय प्रदेशात एक विशेष प्रकारची औषधी वनस्पती मिळते. ज्याला जगभरात मोठी मागणी आहे.
या वनस्पतीच्या सेवनामुळे पुरुषांची शक्ती वाढते, असा दावा करण्यात आलाय.
यार्सा गंबु असं या औषधी वनस्पतीचं नाव आहे. या वनौषधीची आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांची किंमत आहे.
नेपाळी लोक या औषधी वनस्पतीचं फक्त सेवन करत नाही, तर इतर देशांना ते विकतात.
जेव्हा हिमालयाच्या शिखरांवरून बर्फ वितळतो तेव्हा ही औषधी वनस्पती मिळते.
बर्फ वितळत असताना जीव धोक्यात घालून इथले स्थानिक लोक तिथे जाऊन यार्सा गंबु गोळा करतात.
या औषधी वनस्पतीला स्थानिक भाषेत कीडाजाडी असं म्हणतात. याचा काळाबाजारही इथे मोठ्या प्रमाणात होतो.