कोबीचा ज्युस पिण्याचे हे फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील?
मुंबई : कोबीचा उपयोग भाजीसाठी करण्यात येतो. सूपसाठीही कोबीचा उपयोग केला जातो. वजन कमी करण्यासाठी कोबी महत्वाची भूमिका बजावते. कोबी खल्ल्याने त्वचा तजेलदार होती आणि केसांना बळकटी मिळते.
कोबीत व्हीटॅमिन जास्त प्रमाणात आहे. अॅंटी-ऑक्सीडेंट आणि फायटोकेमिकल्स असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
कोबीचा ज्युस पिण्याचे हे आहेत लाभ
१. कोबीचा ज्युस सेवन केल्याने अल्सर होण्याचा धोका कमी असतो.
२. ज्यांना कॅन्सरचा धोका आहे. त्यांना कोबीचा ज्युस अधिक लाभदायक आहे. कोबी ज्युसमुळे कॅन्सरला आळा किंवा रोखण्यास मदत होते. कोबीतील सल्फोराफेनमुळे हे शक्य होते.
३. कोबीचा ज्युस मोतीबिंदू होण्यापासून रोखण्यास मदत करतो. डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
४. त्वचेसाठी कोबीचा ज्युस खूप लाभदायक आहे. त्वचा संदर्भात ज्या काही अनेक समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते. व्हीटॅमिन अधिक असल्याने त्वचा रोग परसण्यास मदत होते.
५. दररोज कोबीचा ज्युस सेवन केल्याने प्रतिकार शक्ती अधिक वाढते. त्यामुळे अनेक आजारांना सहज तोंड देता येते.
कोबीचा ज्युस पिण्याचे हे फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील?
