भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी पुन्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीने पुन्हा एकदा आपली हेअर स्टाईल बदलली आहे.
माहिचं डॅशिंग लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. भारतातले प्रसिद्ध हेअरस्टाईलिश आलिम हकिमने इन्स्टाग्रावर धोनीच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे.
आलिम हाकिम यांनी धोनीची नवी हेअर स्टाईल केली आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोत धोनीने डोक्याच्या दोन्ही बाजूने बारीक केस ठेवलेले दिसतायत.
धोनीने या लूकबरोबरच आपल्या लांब केसांच्या हेअर स्टाईलला गुडबाय केलं आहे. धोनीच्या या हेअर स्टाईलला 'साइडफेड' असं म्हटलं जातं.
महेंद्रसिंग धोनी आपल्या हेअरस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. आयपीएल 2024 पूर्वी धोनीने मोठे केस ठेवले होते.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात एमएस धोनी नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसतो. ही परंपरा त्याने या आयपीएलमध्येही कायम ठेवली आहे.
धोनीने 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनी यंदा आपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्समधून खेळणार की नाही याबाबतही सस्पेन्स आहे.