वैमानिक असो किंवा एअर होस्टेस यांना विमानातून प्रवास करताना अनेक नियम पाळावे लागतात.
तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल की, पायलट किंवा एअर होस्टेस हे विमान प्रवासदरम्यान परफ्यूम लावू शकत नाही.
खरं तर परफ्यूम लावण्यावर बंदी असण्यामागे खूप महत्त्वाचे कारण आहे.
वैमानिकांना नेहमीच सतर्क राहावे लागते. तीव्र सुगंध त्यांचे लक्ष विचलित करू शकतात आणि हवाई प्रवासासाठी धोका बनू शकतात.
विमान प्रवासापूर्वी वैमानिकांची अल्कोहोल टेस्ट केली जाते. परफ्यूममध्ये अनेकदा अल्कोहोल असते. ज्याचा परिणाम चाचणीवर होऊ शकतो.
अनेकांना तीव्र सुगंधाची ॲलर्जी असते त्यामुळे ही बंदी करण्यात आली आहे.
पायलट किंवा क्रू मेंबर यांनी तीव्र परफ्यूम लावल्यास प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होई शकतो.
परफ्यूमच नाही माउथवॉश , टूथपेस्ट आणि अल्कोहोल असलेले कोणतेही उत्पादनावर पायलट आणि क्रू मेंबरला बंदी असते.