दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड हँड वॉशिंग डे म्हणून साजरा केला जातो. अनेकांनाच हात धुण्यासाठी प्रोत्साहित करणं हा या दिवसामागचा मुख्य हेतू असतो.
हात धुण्याच्या सवयीमुळं अनेक संसर्गांपासून दूर राहता येतं. पण, किती वेळा हात धुवावेत हेच अनेकांना ठाऊक नसतं.
जाणकारांच्या मते दिवसातून किमान 6 ते 10 वेळा हात धुवावेत.
साधारण 40 सेकंद ते 1 मिनिट इतक्या वेळापर्यंत हात धुवावेत.
जेवणाआधी आणि कुठूनही बाहेरून आल्यास हात धुण्याची सवय ठेवावी.
शौचालयाचा वापर केल्यावरही हात स्वच्छ धुवावेत.