तज्ज्ञ सांगतात की, सकाळी झोपून उठल्यानंतर ब्रेश न करता दोन ग्लास पाणी प्यायला हवं.
त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि दिवसभर चयापचय सुरळीत राहतं.
त्याशिवाय जेवण्याच्या अर्धा तासा आधी एक ग्लास पाणी प्यायला हवं. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते, भूक नियंत्रणात राहते आणि कॅलरीजं सेवन कमी होतं.
जेवण्यादरम्यान गरज असेल तर एखाद घुट पाणी पिणे योग्य असतं. अति पाण्याचं सेवन मात्र घातक ठरतं.
तर झोपण्याच्या एक तास आझी पाणी प्यायल्याने निर्जलीकरण टाळतं आणि झोपेच्या दरम्यान चयापचय कार्यांना समर्थन मिळतं.
शारीरिक हालचालींपूर्वी पाणी पिण्याने शरीराची कार्यक्षमता वाढते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
वर्कआऊटनंतर हायड्रेटिंग केल्याने हरवलेले द्रव भरून काढण्यास मदत होते आणि स्नायू पुनर्प्राप्ती, संपूर्ण आरोग्य राखण्यास आणि वजन व्यवस्थापनास करण्यास मदत मिळते.
जर तुम्हाला खूप पोट भरल्यासारखे वाटत असेल तर, पाणी पिण्याने पचन सुलभ होते आणि जास्त खाण्याची प्रवृत्ती कमी होते. मात्र जेवणानंतर लगेच जास्त द्रवपदार्थ घेणे टाळा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)