प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा व्हॅलेंटाईन्स डे 14 फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जाणार आहे. यात अनेक तरुण मंडळी आपल्या जोडीदाराला प्रपोज करतील.
तेव्हा महिलांना पुरुषांच्या स्वभावातील कोणत्या गोष्टी जास्त आवडतात हे जाणून घेऊयात.
महिलांना दयाळू आणि सौम्य स्वभावाचे व्यक्ती जास्त आवडतात.
साधारणपणे महिलांना असे पुरुष चांगले वाटतात जे त्यांचा आदर करतात आणि त्यांची काळजी घेतात.
असे पुरुष महिलांचं मन लवकर जिंकतात.
काही अभ्यासातून समोर आलं आहे की महिला त्यांना हसवणाऱ्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. अशा महिलांना आपल्या जोडीदाराचा सेन्स ऑफ ह्युमर आवडतो.
महिलांना त्यांना हसवणारे पुरुष मनमोकळ्या स्वभागाचे आणि सकारात्मक वाटतात.