EPFO पीएफ खातेधारकाच्या सहाय्यासाठी आपल्या नियमात बदल करणार आहे. यामुळे लोकांचा त्रास कमी होणार आहे.
रिपोर्ट्सनुसार सरकारकडून ईपीएफओ 3.0 जून 2025 पर्यंत सादर केला जाईल.
ईपीएफओचे पैसे काढणे हा कर्मचाऱ्यांसाठी मोठा टास्क असतो.
पीएफची रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात. किचकट ऑनलाइन प्रक्रिया पार करावी लागते.
पण आता कर्मचाऱ्यांचे पैसे काढण्याचा ताण थोडा कमी होणार आहे.
ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, पीएफ फंड एटीएमद्वारे काढू शकता.
पीएफ होल्डर कधीपासून एटीएममधून पैसे काढू शकतील? याची अधिकृत अपडेट देण्यात आली नाही.
ईपीएफओ 3.0 अंतर्गत या सुविधेचा लाभ घेता येईल. त्यांना एटीएमसाठी पोर्टलवर अप्लाय करावे लागेल.
पीएफ होल्डर एटीएमद्वारे 50 टक्के पैसे काढू शकतो.
पीएफ होल्डरचा मृत्यू झाल्यास नॉमिनीदेखील एटीएमद्वारे पैसे काढू शकतो.