फेब्रुवारीमध्ये घरी लावा 'ही' फुलझाडं, घरभर सुटेल फुलांचा सुवास

तेजश्री गायकवाड
Feb 01,2025


फेब्रुवारी महिन्यात वसंत ऋतूमध्ये अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुले सहज उमलतात. या फुलांनी तुम्ही तुमच्या घराची बाग आणि बाल्कनी सजवू शकता.

झेंडू

बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यांमध्ये तुम्ही पिवळ्या, केशरी किंवा लाल रंगाच्या झेंडूच्या फुलांची रोपे लावू शकता. झेंडूच्या रोपाला हळद, सूर्यप्रकाश आणि पुरेसे पाणी लागते.

पेटुनिया

गुलाबी, पांढरे आणि जांभळ्या रंगात येणाऱ्या पेटुनियाची रोपे लावू शकता. ही झाडे हलक्या सूर्यप्रकाशात चांगली वाढतात. ही झाडे कमी पाण्यातही वाढतात.

पोर्तुलाका

पोर्तुलाकामध्ये अनेक रंगांमध्ये लहान आकारात येणारी चमकदार फुले आहेत. याला कमी पाणी आणि उत्तम सुर्प्रकाश लागतो.

डहलिया

बाल्कनीचे सौंदर्य वाढवण्याचे काम डहलियाची फुलं करतात. ही वनस्पती कमी पाण्यात चांगली वाढते.

कॅलेंडुला

कॅलेंडुला ही केशरी आणि पिवळी फुले असलेली एक वनस्पती आहे. हलक्या सूर्यप्रकाशात याची वाढ होते.

VIEW ALL

Read Next Story