काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या दाढीची वाढ लवकर करू शकता.
नारळ तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून दाढीवर मसाज करा. यामुळे दाढीची वाढ लवकर होते.
आवळा आणि लिंबाचा रस गालावर लावल्यास दाढी येण्यास फायदेशीर आहे.
आवळा आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा.
दालचिनी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि दाढीच्या भागावर लावा. यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते.
चांगल्या दाढीसाठी तुमचा आहारही चांगला असावा लागतो. अंडी, दूध आणि हिरव्या भाज्या खाल्ल्याने दाढी वाढण्यास गती मिळते.
कोरफडीमुळे केसांची नैसर्गिक वाढ होण्यास मदत होते. दाढीच्या भागावर अॅलोवेरा जेल लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)