मिठाशिवाय खाद्यपदार्थाची चव ही अपुर्णच असते. गोड पदार्थ वगळून सर्वच खाद्यपदार्थात मीठाचा वापर केला जातो.
कोणत्याही भाजीत कितीही मसालेदार पदार्थ वापरले तरी मिठाशिवाय ती भाजी ही बेचवच होते.
मीठ जेवणाची चव तर वाढवते परंतु, जर खाद्यपदार्थात प्रमाणापेक्षा जास्त मीठ पडलं तर त्याची चव पूर्णपणे बिघडून जाते.
जर तुमच्या भाजीत चुकून मीठ जास्त पडलं तर 'या' तीन गोष्टींचा वापर करुन तुम्ही मिठाचे प्रमाण नियंत्रित करु शकता.
भाजीतील मीठाचे अधिक प्रमाणाला लिंबूच्या सहाय्याने नियंत्रित केले जाऊ शकते. भाजीत मीठ जास्त झाल्यावर त्यात लिंबू टाका.
बटाट्यामध्ये मीठ शोषून घेण्याची क्षमता असते. भाजीत अतिरिक्त प्रमाणातील मीठ बटाटा शोषून घेते ज्यामुळे भाजीतील मीठाचे प्रमाण योग्य होते.
भाजीत अधिक प्रमाणात मीठ पडल्यावर त्यात दही घालून भाजीतील मीठाचे अतिरिक्त नियंत्रित केले जाऊ शकते.