अलाउद्दीन खिल्जीविषयी इतिहासकारांनी अनेक संदर्भांमध्ये लिहिलं.
याच अलाउद्दीन खिल्जीच्या दोन राजपूत पत्नीसुद्धा होत्या असं सांगितलं जातं.
खिल्जीच्या एका राजपूत पत्नीचं नाव होतं. कमला देवी. गुजरातच्या राजपूत राजा कर्ण वाघेला यांची ही पत्नी.
1299 मध्ये अलाउद्दीन खिल्जीच्या सैन्यानं गुजरातवर हल्ला केला होता, जिथं कर्ण वाघेला राजाचा पराभव झाला होता.
युद्धात पराभूत झाल्यानंतर राजानं संपत्तीशिवाय साम्राज्य आणि पत्नीसुद्धा गमावल्या. राजा पराभूत झाल्यानंतर राणी कमलादेवीनं खिल्जीशी विवाह केला असं सांगितलं जातं.
गुजरातचे इतिहासकार मकरंद मेहता यांच्यानुसार अलाउद्दीन खिल्जी आणि कमला देवी यांच्या लग्नाचे पुरावेही आढळतात. पद्मनाभनं 1455-1456 मध्ये कान्हणदे प्रबंध लिहीली, ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित या पुस्तकामध्ये लग्नाचे पुरावे आढळतात.
जियाउद्दीन बरनीच्या तारीख-ए-फिरोदशाहीनुसार 1296 मध्ये दख्खनच्या देवगिरी इथं खिल्जीनं यादव राजा रामदेव यांच्यावर आक्रमण केलं होतं. आक्रमणावेळी लष्कराअभावी या राजानं खिल्जीपुढं आत्मसमर्पण केलं. यामध्येच राजानं संपत्ती, हत्ती, घोडे गमावत मुलगी झत्यपलीदेवी हिचं लग्न खिल्जीशी लावून दिलं.